नागपूर : राज्यसभेसाठी झालेल्या मतदानादरम्यान विदर्भातील अपक्षांनी कोणाच्या बाजूने मतदान केले यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला असतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांची मते महत्त्वाची ठरणार असल्याने ते कोणती भूमिका घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विदर्भात देवेंद्र भुयार (मोर्शी), आशीष जयस्वाल (रामटेक), विनोद अग्रवाल (गोंदिया), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), रवी राणा (बडनेरा) आदी अपक्ष आमदार आहेत. यापैकी आशीष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेला पाठिंबा आहे. विनोद अग्रवाल व रवी राणा भाजपाच्या गटात तर देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीबरोबर आहेत. किशोर जोरगेवार याची भूमिका अस्पष्ट आहे.



