देहूगाव,दि.१६ (वार्ताहर) पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिकेच्या जलसंपदा विभागाकडून सुरू असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा पाणीपुरवठा योजनेच्या कामा दरम्यान देहू व येलवाडी येथील खोदण्यात आलेल्या रस्त्याचे दुरुस्ती व डांबरीकरण काम करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पाणी पुरवठा करण्यासाठी बालाजी इंजीनिअरिंग या ठेकेदाराकडून भामा आसखेड धरणातून पाणी योजनेचे काम सुरू आहे. या कामाच्या हद्दीतील देहू आणि येलवाडी दरम्यान असणारे रस्त्या खोदुन भूमिगत जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र देहू येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक वारकरी येत असतात.त्यांच्या सुरक्षितेच्या पार्श्वभूमीवर देहू येणाऱ्या मार्गावरील देहू – येलवाडी दरम्यानचा व देहू परिसरात खोदण्यात आलेल्या रस्त्याचे मुरमीकरण करण्यात आले होते . त्यावर दुरुस्ती व डांबरीकरण काम करण्यात आले आहे.



