पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23 वा वर्धापन दिन 10 जून रोजी साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 18 जून रोजी आकुर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर व उद्या 19 जून रोजी दापोडी ते निगडी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धापन दिनानिमित्त शहरातील प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा (NCP Flag) व दारावर स्टीकर लावण्याची मोहीम सुरू आहे. राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह सुरू असून यामध्ये अनेक कार्यक्रमांची नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पर्यावरणविषयक जनजागृती, युवक, युवती, विद्यार्थी यांच्याकरीताही वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज आकुर्डी येथील खंडोबा मंदिराच्या लगत असणाऱ्या मंगल कार्यालयात सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.





