- पिंपरी चिंचवड , गुन्हे शाखा , युनिट १ ची धडाकेबाज कारवाई
वडगांव मावळ :- पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सुचने नुसार गुन्हे शाखा , युनिट -१ चे पोलीस पथक युनिटचे हददीत फ़रारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार महादेव जावळे व बाळु कोकाटे यांना बातमीदाराकडुन माहिती मिळाली की , काळेवाडी परीसरात राहणारे अदित्य उर्फ़ सोन्या चौव्हाण व राम विजय जाधव हे काळेवाडी चौकात असताना त्यांनी तळेगाव किंवा वडगाव मावळ परीसरात कोठेतरी कोणाचा तरी खून केला असल्याबाबत चर्चा करत होते . अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी युनिट १ कडील स्टाफचे दोन पथके तयार करून त्यांचा योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून पथकासह स्वतः काळेवाडी , रहाटणी , आकुर्डी या परिसरात जावुन बातमीतील नमुद इसमांचा शोध घेत असताना आकुर्डी येथील जयगणेश व्हीजन , आयनॉक्स थिअटरचे पार्किंगमध्ये राम जाधव व अदित्य उर्फ सोन्या चव्हाण हे दोघे त्याच्या मित्रासोबत दिसले. त्यावेळी त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करून मोठ्या सिताफीने पकडण्यात यश आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले राम विजय जाधव , (वय २२ वर्षे , रा . पंचतारा नगर , आकुर्डी ), आदित्य ऊर्फ सोन्या सुरेंदर चौव्हाण , (वय २२ वर्षे , रा . श्री बालाजी गल्ली नं .२ , धनगर बाबा मंदिरामागे , काळेवाडी) यांच्याकडे सखोल चौकशी करता दिनांक ७ जून रोजी आरोपी व त्याचे इतर ६ मित्र असे वडगाव मावळ येथे वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात असताना मातोश्री हॉस्पीटल जवळ , रोडचे कडेला असणारे पानचे टपरीवर थांबलेल्या इसमांशी किरकोळ कारणावरून त्यांची भांडणे झालेली होती व टपरी चालक व त्यांचे मित्रांनी त्यांना मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपी व त्याचे ६ साथीदार यांनी दि .१३ जून रोजी भांडणाचे तयारीत पुन्हा पानाच्या दुकानाजवळ जावुन त्यांना मारहाण करणा-या माणसावर त्यांनी तलवार व कोयत्याने वार केले असल्याची माहिती त्यांनी दिली .
सदरबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडे खातरजमा करता त्याच्याकडे सदर घटेनबाबत हत्या केल्याचा गुन्हा दाखल असुन सदरच्या मारहानीत विश्वजीत देशमुख (वय २२ वर्षे) हा मयत झाल्याचे व भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या मयताचा मित्र सागर इंद्रा यास गंभीर जखमी करून आरोपी पसार झाल्याची माहिती त्यांनी दिली. अशा प्रकाराने अज्ञात इसमाविरुदध दाखल झालेला खुनाचा गुन्हा केवळ ऐकिव माहिती गाभिर्याने घेऊन त्याची खातरजमा करुन उघडण्यात गुन्हे शाखा , युनिट १ यांना यश मिळालेले आहे..




