पुणे ; पुणे महानगरपालिकेने (PMC) धायरी येथील सुमारे 50,000 चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडले. या परिसरात प्रथमच चार सहा मजली इमारती पाडण्यात आल्या. यावेळी नागरिक व संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी जोरदार विरोध केला. मात्र, विरोधाला न जुमानता ही कारवाई करण्यात आली.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता राहुल तिखे, इमारत निरीक्षक संदेश पाटील, कनिष्ठ अभियंता धनंजय खोले, निशिकांत चाफेकर, हेमंत कोळेकर, किरण अहिरराव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. साळुंके यांना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
या कारवाईत जबडा कटर मशीन, एक जेसीबी आणि पंधरा कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. पीएमसीमध्ये समाविष्ट गावांचा विकास आराखडा अद्याप तयार झालेला नाही. अनधिकृत बांधकामांमुळे हा विकास आराखडा तयार करण्यात अडथळे येत आहेत. तरी नागरिकांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता राहुल साळुंके यांनी केले आहे.




