पिंपरी : राष्ट्रवादी पदवीधर संघात उच्चशिक्षित महिलांची वर्णी लावण्यात आली आहे. पदवीधरांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी पदवीधरांच्या संघटनेत काम केले पाहिजे असे प्राध्यापक असलेल्या तेजस्विनी कोकीळ यांना वाटते. कोकीळ यांची पदवीधरांबद्दल असलेली तळमळ पाहून राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील यांनी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मान्यतेने तेजस्विनी कोकीळ यांची राष्ट्रवादी पदवीधर पिंपरी विधानसभेच्या संघटक पदी नेमणूक केली. तेजस्विनी यांच्या आईसुद्धा शिक्षिका आहेत. त्यांनीसुद्धा पदवीधर आणि शिक्षकांसाठी काम करण्याची इच्छा दर्शवली.
मनीषा कोकीळ यांची पदवीधर संघाच्या शहर उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. मनीषा कोकीळ ह्या ATD ,ART MASTER (AM ) आहेत तर त्यांच्यी कन्या तेजस्विनी Mcom आहेत. निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादी युवक संघाचे सरचिटणीस विशाल काळभोर , राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते आणि पदवीधर संघाचे शहर अध्यक्ष माधव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. आई आणि मुलगी राष्ट्रवादी पक्षाच्या एकाच सेलमध्ये कार्यरत झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




