मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण पुढे बोलताना खडसे म्हणाले की ते मत देतील अशी आशा नाही असं म्हटलं. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात
भाजपामध्ये माझे अनेक समर्थक आहेत. काहींना तिकीट देण्यासाठी मी मदत ही केली आहे. मंत्रीमंडळात स्थान देण्यासाठी ही मदत केली आहे. भाजपामध्ये बरेच जण माझ्याशी मनापासून प्रेम करणारे आहेत. मात्र ते पक्ष सोडून मला मतदान करतील असं वाटतं नाही. परंतु काही लोक माझ्या संपर्कात आहेत. परंतु त्यांनी मला मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली नसल्याचं सांगितलं आहे. भाजपाची भूमिका ही केवळ एकनाथ खडसे पडले पाहिजे अशी नाही, तर महाविकास आघाडीचे उमेदवार पडले पाहिजे अशी असल्याच खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.



