शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या बंडानंतर महाराष्ट्रात राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने या राजकीय परिस्थीतीवर चर्चा करण्यासाठी महत्वाची बैठक बोलावली आहे. तसेच काँग्रेसमधील सर्व आमदारांना तातडीने मुंबई गाठण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
- काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ४४ आमदारांपैकी ४२ आमदार या बैठकीत सहभागी आहेत. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या बैठकीसाठी सर्व काँग्रेस आमदारांना निरोप पाठवण्यात आले होते. परंतु, काही आमदारांचा फोन नॉट रिचेबल येत असल्यामुळे काँग्रेस नेत्यांची झोप उडाली होती.



