मुंबई : सध्या राज्यात राजकीय अस्थिरता आहे. निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं आहे. भाजपसोबत जाण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. उद्धव ठाकरेंनी तर थेट एकनाथ शिंदेंनी सांगावं मी योग्य राज्य कारभार करत नाही मी आता राजीनामा देतो, असं म्हटलं. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळं ट्विट केलं आहे. “पक्षात या मगच सरकार स्थापन करू, भाजपची एकनाथ शिंदेंसमोर अट?”, असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022
प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट काय
प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपमध्या येण्याची अट टाकली आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.



