पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ३१ मे २०२२ पर्यंतची मतदार यादी गृहीत धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण मतदारसंख्या १४ लाख ८८ हजार इतकी झाली आहे. वाकड प्रभागात सर्वाधिक ५२ हजार मतदार असून पुनावळे-ताथवडे प्रभागात सर्वात कमी २१ हजार मतदार आहेत.
महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी गुरूवारी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सदर मतदार यादी महापालिकेच्या संकेतस्थळासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ३१ मे २०२२ रोजी मतदार यादीत नाव असेल, त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांनी त्यांचे नाव संबंधित प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत असल्याची खात्री करावी. यासंदर्भातील दुरूस्त्या करण्यासाठी २३ जून ते १ जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहे. त्यावर समक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार असून योग्य हरकती तथा सूचनांवर तत्काळ कार्यवाही करण्यात येणार असून ९ जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
- प्रभागनिहाय प्रारूप मतदार संख्या
प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव मतदार संख्या
१ तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर – ३५,०२९
२ चिखली गावठाण – मोरेवस्ती-कुदळवाडी – ३२,४१९
३ मोशी, बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी – ४६,२०६
४ मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव – २२,९५७
५ चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी – ३५,७०५
६ दिघी-बोपखेल – ३५,७२६
७ भोसरी सॅण्डविक कॉलनी – २४,०९३
८ भोसरी गावठाण-गवळीनगर- ३६,४७१
९ भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत – ३३,२२४
१० भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती – ३४,६३९
११ भोसरी, बालाजीनगर-स्पाइन रस्ता – २३,३६९
१२ चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती – २४,४५७
१३ चिखली, मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती – ३६,११९
१४ निगडी, यमुनानगर – ३०,२७९
१५ संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर – २९,६५१
१६ नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर – २८,५०४
१७ संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर – २३, ०२१
१८ मोरवाडी-मासूळकर कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी – ३७,७८७
१९ चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर – ३०,४७९
२० काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर – ३३,२५२
२१ आकुर्डी गावठाण-दत्तवाडी – ३४,२८१
२२ निगडी गावठाण-ओटास्किम – ३२,५६५
२३ निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी – ३२,७८०
२४ रावेत-किवळे-मामुर्डी – ५१,९८३
२५ वाल्हेकरवाडी – २९,४४१
२६ चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर – २७,४११
२७ चिंचवड, केशवनगर-श्रीधरनगर – ३३,५७७
२८ रामकृष्ण मोरे सभागृह – ३७,०४१
२९ भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर- ३६,३४३
३० पिंपरीगाव-वैभवनगर – ३५,७६३
३१ काळेवाडी-विजयनगर-नढेनगर – २७,४२०
३२ काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर – ३१,५०४
३३ रहाटणी-तापकीरनगर – २३,१४७
३४ थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर -२१,१८६
३५ थेरगाव, बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर – २४,३९४
३६ थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर- ३१,१५१
३७ ताथवडे-पुनावळे – २१,१०२
३८ वाकड – ५२,६४८
३९ पिंपळेनिलख -३०,७५०
४० पिंपळेसौदागर- ४०,९४३
४१ पिंपळेगुरव गावठाण-जवळकरनगर – ३९,२५२
४२ कासारवाडी-फुगेवाडी – ३२,५१०
४३ दापोडी – ३८,७०९
४४ पिंपळेगुरव-काशीद नगर- २१,६५४
४५ नवी सांगवी सर्वसाधारण – २७,३०९
४६ जुनी सांगवी – ३९,८७७
एकूण मतदारसंख्या – १४ लाख ८८ हजार १२९
विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारसंख्या (३१ मे २०२२ अखेर)
चिंचवड – ५ लाख ८६ हजार ८४९
भोसरी – ५ लाख २७ हजार ७९९
पिंपरी – ३ लाख ७६ हजार ४७०
भोर (ताथवडेगाव) – ९ हजार ५७५




