मुंबई : शिवसेनेच्या विधिमंडळ बैठकीला ईमेल पाठवून ही गैरहजर राहिल्याबद्दल शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे १२ बंडखोर आमदार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार आल्यापासून १२ आकड्यांचा खेळ सुरूच आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
यामध्ये आमदार एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, महेश शिंदे, संदीपान भुमरे, भरत गोगावले, लता सोनवणे, अनिल बाबर, अब्दुल सत्तार, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर या बंडखोर आमदारची आमदारकी रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने नेते अरविंद सावंत यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे केली असल्याची माहिती माध्यमांना सांगितले आहे.



