मुंबई : बंडखोर मंत्री एकनाथ शिंदेच्या सोबत असलेल्या सोळा आमदारांना महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींकडून अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय संकट शनिवारी अधिक तीव्र झाले. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना सोमवार २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना नेत्यांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. “आम्ही 6 ठराव पारित केले आहेत आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला अनुसरणार आहे आणि अखंड महाराष्ट्राच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही,” असे राऊत म्हणाले.


