मुंबई : आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी कर्जत येथील एका कार्यक्रमात बंडखोर आमदारांना राजीनामा देण्याचं चॅलेंज दिलं आहे. बंडखोरांनी राजीनामा द्यावा, त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडिओ ट्विट करुन टीका केली होती. आता आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांचा एक किस्सा सांगत टीका केली.
गुलाबराव पाटील यांच्यावर आज सकाळी संजय राऊत यांनी टीका केली होती. आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांचा एक किस्सा सांगितला. त्यादिवशी माझ्या गाडीत बसायला गुलाबराव पाटील घाबरत होते. गाडीत बसल्यावर हात थरथरायला लागले. कशाला घाबरताय गुलाबराव असं मी विचारलं, त्यानंतर मला एका कार्यकर्त्यांनं सांगितलं की ७ वाजल्यानंतर त्यांची थरथरायची वेळी सुरु झाली, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.



