मुंबई : भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. मुंबईत भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
आमदारांना हजर राहण्याचे आदेश….
एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे.आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत



