पिंपरी : पिंपळे निलख प्रभाग क्रमांक २६ येथील अशोक कामठे उदयानाजवळ आणि नदी पात्रालगतचे पत्राशेड अतिक्रमण पथकाची कारवाई करण्यात आली. बाणेर कडून पिंपळे निलख येथे येताना नदीपत्रालगत अनेक पत्राशेड उभारली होती. यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने यावरती जोरदार मोहीम सर्व पत्राशेड जमीनदोस्त केली आहेत.





