मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी बोलावलेल्या फ्लोअर टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकत उच्च न्यायालयाने मलिक व देशमुख यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानासाठी परवानगी द्यावी याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. काही वेळापूर्वी, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य व्हीप सुनील प्रभू यांनी राज्यपालांच्या फ्लोअर टेस्टच्या आवाहनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली. ठाकरे सरकार यांना उद्या बहुमत चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच बरोबर मलिक व देशमुख यांनाही मतदानासाठी मान्यता दिली आहे.



