लोणावळा – मावळ तालुक्यातील शेतक-यांच्या विविध हक्कांसाठी लढत असणा-या कार्ला परिसरातील एकविरा कृती समितीच्या अध्यक्षपदी शिलाटणे येथील बाळासाहेब निवृती भानुसघरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
एकविरा कृती समिती ने वर्षभरात शेतक-यांच्या हितासाठी शेतक-यांच्या हक्कांसाठी पीएमआडीएच्या विरुध्द आवाज उठवला तसेच शेतीसाठी नदीपात्र खोलीकरण करण्यासाठी विविध आंदोलनाचा माध्यमातून शेतक-यांना मदत केली.पुढे देखील शेतक-यांच्या हितासाठी लढणारी ही समिती आहे.
यावेळी कृती समितीचे संस्थापक माजी जिल्हापरिषद सदस्य भाई भरत मोरे,माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,किरण हुलावळे,नंदकुमार पदमुले,भाऊसाहेब मावकर,गुलाब तिकोणे,सुरेश गायकवाड संजय देवकर उपस्थीत होते.



