वळगाव मावळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा काल दिला. शिवसेनेचे आमदार फुटल्यामूळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. याचा निषेध म्हणून मावळ शिवसेनेच्या वतीने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर गुरुवारी सकाळी ६ वाजता टायर जाळून रस्ता अडविण्यात आला.
शिवसेना मावळ च्या वतीने सोमटणे फाटा येथे शिवसैनिकांनी जूना मुंबई पुणे हायवे सकाळी ६ वाजता अडवून आंदोलन करण्यात आले. मविआ सरकार कोसळल्यानंतर मावळ शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. भल्या सकाळी हा प्रकार घडल्याने मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर व शिवसैनिकांनी हे आंदोलन केले.




