मुळशी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अंकुशभाऊ मोरे युवा मंच यांच्यावतीने माले येथील कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात कोळवण-माले जिल्हा परिषद गटातील इयत्ता १० वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
त्याप्रसंगी प्रदिपदादा गारटकर, जिल्हा अध्यक्ष रामभाऊ ठोंबरे, महादेव आण्णा कोंढरे, माजी सभापती पांडूरंग भाऊ ओझरकर, माजी उपसभापती विजय केदारी, दगडूकाका करंजावणे, सुनिलशेठ वाडकर, सचिनशेठ अमराळे, विलास अमराळे, विठ्ठल पडवळ, विनोद कंधारे, विजय येनपुरे, विजय कानगुडे, निलेश पाडाळे, उज्वला पिंगळे, अंकुशभाऊ वाशिवले आदी मान्यवर उपस्थित होते.




