पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सिनेट निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी शहरातून १५००० पदवीधरांची नोंदणी करण्याचे ध्येय शहर राष्ट्रवादीने ठेवले आहे असे गव्हाणे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेशचे विध्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मागच्या निवडणुकीची रणनीती सांगितली.शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप तापकीर यांनी पदवीधरांची नोंदणी कशीकरायची याबद्दल मार्गदर्शन केले. पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी सिनेट निवडणूक का महत्वाची हे सांगितले.
यावेळी माधव पाटील म्हणाले की शहरातून सिनेटवर एक तरी प्रतिनिधी निवडून जावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलपाहिजेत. शहरातील विध्यार्थ्यांना विद्यापीठातील अनेक योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी शहर राष्ट्रवादीने पदवीधरांची नोंदणी केली पाहिजे. यावेळी शहर अध्यक्ष अजितगव्हाणे म्हणाले की पदवीधर आमदारकीप्रमाणे शहर राष्ट्रवादीनेसिनेट निवडणूक गांभीर्याने लढवण्याची ठरवले आहे.
या बैठकीस शहर संघटक अरुण बोऱ्हाडे , मा. नगरसेवक विट्ठल ऊर्फ नाना काटे, संगीता ताम्हणे, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, खजिनदार दीपक साकोरे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, शक्रूल्ला पठाण, पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे, सेवादल अध्यक्ष महेश झपके, मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, संगीता ताम्हाणे, पल्लवी पांढरे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, महीला संगटीका कविता खराडे, युवा नेते शाम जगताप, पोपट पडवळ, व्यवस्थापन सेल अध्यक्षअकबर मुल्ला आदी उपस्तिथ होते.




