निगडी : आकुर्डी येथील बंटी प्रॉपर्टीज शेजारील गाळ्यासाठी भरलेली अनामत रक्कम परत देण्यास महानगरपालिका प्रशासनाकडुन टाळाटाळ करण्याचा नुकताच समाेर आला आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की बंटी ग्रुप आकुर्डी ह्या इमारतमध्ये दहा वर्षे भाडेतत्त्वावर गाळा भाड्याने घेण्यासाठी मेघा सचिन काळभोर (रा.निगडी) ह्यांनी २३/३/२०२२ रोजी डीडी स्वरुपात पिंपरी फूड महानगरपालिका ह्यांना ५ लाख ४२ हजार ८०० रुपये भरले होते. सदर गाळा ताबा रद्द करण्यात आली त्यामुळे मेघा सचिन काळभोर ह्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्यांना सदर गाळा भाडे भरले होते ते पुन्हा मिळावे म्हणून मागणी करण्यात आली होती पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन गेल्या तीन ते चार महिने झाले आहे.
अनामत रक्कम देण्यासाठी टाळाटाळ
भुमी जिंदगी विभाग अधिकारी जोशी साहेब असे सांगत आहेत की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्यांच्या कडे रक्कम देण्यासाठी शिल्लक नाही मेघा सचिन काळभोर ह्यांनी आज पुन्हा अनामत रक्कम मिळावी म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांच्या कडे लेखी पत्राद्वारे मागणी केली असून आमचे कष्टाचे पैसे आहेत आम्ही अनुदान किंवा मदत मागत नाही आमचे अनामत रक्कम मिळावी अशी विनंती मेघा सचिन काळभोर यांनी महानगर पालिका प्रशासनाकडे केली आहे.




