कार्ला– मावळ तालुक्यात जोरदार पावसाची बॕटींग सुरु असून मावळातील सर्व पर्यटनस्थळी विकेंन्डला शनिवार रविवारी हजारो पर्यटकांनी भेट देत असून कार्ला परिसरातील लोहगड,विसापूर किल्ले तसेच भाजे येथे असणा-या दोन ते तीन धबधब्यांना पर्यटकांनी पंसती देत असून पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलून गेले होते.
कार्ला आई एकविरादेवी रोड तसेच कार्ला मळवली रोडवर वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून पर्यटकांना तासोंतास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या वाहतुक कोंडीवर नियंत्रण कसे ठेवावे असा प्रश्न येथे पोलिस प्रशासनला पडला असून शनिवारी रविवारी मळवली स्टेशन तसेच कार्ला फाटा,वेहरगाव आई एकविरादेवी पायथ्या येथे वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त फौज तैनात ठेवण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.
पर्यटकांनी पुणे- लोणावळा लोकल देखील तुडुंब भरुन येत असल्याने मळवली रेल्वेस्टेशनवर देखील गर्दी झालेली होती. पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत असल्याने स्थानिक नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाल्याने स्थानिक देखील आनंदीत झाले आहेत ,




