पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. यासाठी ते औरंगाबादला रविवारी जाणार आहे. आशावेळी भेटायला आलेल्या सामान्य तरुणाला शरद पवार यांनी विमानातून सोबत औरंगाबादला नेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सतत लोकांमध्ये असणारा आणि कितीही मोठ्या पदावर गेलं तरीही पाय जमिनीवर असणारा नेता कसा असतो बघा काही वर्षांपूर्वी विनोद तावडे जे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते तेव्हा त्यांना मंत्री असून देखील राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसू दिलं न्हवत. pic.twitter.com/oQqcW9k8XD
— yogesh sawant (@yogi_9696) July 10, 2022
डॉ. भरत चव्हाण असे त्या तरुणाचे नाव आहे. चव्हाण या तरुणाने ‘शरद पवार साहेबांसोबत बारामती ते औरंगाबाद विमानाने येतोय मित्रहो! ही संधी मिळणे आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी’ असे फेसबुकवर लिहिले आहे. सोबत विमानातील व्हिडिओही शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर भरभरून प्रतिसाद येत आहे.



