वडगाव मावळ : कान्हे फाटा येथील एका एक्सिक बँकेचे एटीएम मशिन फोडून त्यातील २१ लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.
कान्हे फाटा येथील एटीएम सेंटर फोडून चोरट्यांनी सुमारे २१ लाखांची रोकड लांबविली. एक्सीस बँकेचे एटीएम मशीन उचकटून रविवारी ( दि १० ) मध्यरात्री १:५० वाजच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडले.
या चोरीमुळे एटीएमची सुरक्षा ऐरणीवर आली आहे याप्रकरणी संदीप हिरासिंग जाधव ( वय ३५ रा पिंपळे सौदागर पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कान्हे फाटा येथील एक्सीस बँकेच्या एटीएम मशीनचे शटर उचकटून मशीनची तोडफोड करून मशीनमधील तब्बल २१ लाख २२ हजार ९०० रुपयांची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत.




