चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वतः घर असावे त्याचे जीवनमान उंचवाने या उदात्त हेतूने प्रेरीत होऊन केंद्र सरकार , राज्य सरकार , पिंपरी चिंचवड महानगर पालिका याच्या पुढाकाराने सन २००८ साली घरकुल योजना जाहीर केली. घरकुल वासीयाची सोडत सन २०१२ साली काढण्यात आली प्रत्यक्ष रहिवासी यांना २०१३ मध्ये घर मिळाले.
आज सुमारे साडेपाच हजाराहूनही अधिक अधिक सदनिका मध्ये अंदाजे २४ ते २५ हजार नागरीक राहत आहेत. घरकुल मधील एफ व बी इमारतीच्या १०५० सदनिकातील ७ हजार रहिवासीयांना पावसाळ्यात इमारतीच्या चोहोबाजूनी पाण्याचा वेढा पडला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळी पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावेत अशी मागणी घरकुलवासीय करीत आहेत.
घरकुल योजना मधील इमारती सखल भागात निर्माण झाल्यामुळे घरकुल, नेवाळे वस्ती तसेच संभाजीनगर पासून उतार असल्यामुळे पावसाचे पाणी या इमारतीच्या चोहोबाजूनी वेढले जाते. या इमारतीच्या मधोमध पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भूमीगत असल्याने नागरिकांना पावसाचे गढूळ पाणी पिण्याची वेळ येणार आहे. अशुद्ध पाण्यापासून होणारी रोगराई पसरू शकते. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणी वरती आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील याकडे काय लक्ष देणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.




