कामशेत :- कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हॉस्पिटलच्या वतीने आषाढीवारी निमित्त पंढरपुरातील वारकरी बांधवांची मोफत तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आले. कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व महावीर हॉस्पिटल सर्वेसर्वा डॉ.विकेश मुथा यांच्या पुढाकारातून मागील १६ वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे.
यंदा मोठ्या प्रमाणावर वारकरी बांधव सहभागी झाल्याने,कुणा वारकरी बांधवाना चक्कर येणे, दम लागणे, धाप लागणे असे कित्येक प्रकार घडले. यावेळेस स्थानिक स्वयंसेवक या वारकरी बांधवाना तातडीने प्राथमिक उपचारासाठी महावीर हॉस्पिटलच्या या शिबिरात दाखल करायचे. महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. विकेश मुथा आणि महावीर हॉस्पिटलची टीम तातडीने या रूग्णांवर उपचार करून औषधोपचार करीत होते. याशिवाय हात पाय दुखणे,थंडी,ताप, जुलाब, उलटी, चक्कर येणे अशा अनेक रूग्णांवर उपचार करण्यात आले. वयोवृद्ध महिला व पुरुष वारकरी बांधवांच्या पायाला जखमी झाल्या होत्या त्यावर मलम पट्टी लावून हळूवार फुंकर मारण्याचे काम महावीर हॉस्पिटलच्या टीमने केले.
याशिवाय पायाला मलम लावून मॉलिश करून दिली. बी.पी.शुगर असलेल्या रूग्णांना स्लाईनचा डोस दिला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. कांबेश्वर महादेव ट्रस्टच्या संस्थापिका कांचेनबेन कांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेतला जातो. डॉ. विकेश मुथा यांच्या सह या आरोग्य वारीत गणेश भोकरे, गणेश घोगरे, रामदास वाडेकर,विद्या मालपुटे, सुरेखा खैरनार, गीतांजली वाघवले, प्रमोद पवार सहभागी झाले होते. महावीर हॉस्पिटलच्या वतीने ‘मावळ तालुका दिंडी समाजाच्या धर्मशाळेत मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांवर औषोधपचार केले.




