पिंपरी : गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन…. गुरू पौर्णिमा दरवर्षीच येत असते. मात्र, आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या गुरुशिष्यामधील नातं दर्शविणारं गुरुपौर्णिमा यामधून राजकीय नेत्यांनी या वर्षीची गुरु पौर्णिमा ही वेगळ्याच पद्धतीने साजरी केली. यात पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे ग्रामीण भागात साजरी केलेली गुरु पौर्णिमेची चर्चाच ok असल्याची पहायला मिळाली.
गुरू पौर्णिमा प्रमुख्याने शाळा, महाविद्यालये व अध्यात्मिक क्षेत्रात साजरी केली जाते. मात्र धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची वेगळी क्रेझ निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात राजकीय नेत्यांनी धर्मवीर चित्रपटात दाखविल्या प्रमाणे आपल्या राजकीय गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरू पौर्णिमा मोठ्या थाटात साजरी केलेली पहायला मिळाली.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदांच्या अनुषंगाने अनेक इच्छुकांनी तिकीट मिळविण्यासाठी व आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आपल्या राजकीय गुरूंचे पाय धुऊन त्यावर चंदन लाऊन फुले वाहून साजरी केली. त्या धर्मवीर गुरू पौर्णिमेचे फोटो व व्हिडिओ करत त्या चित्रपटातील गानं लाऊन सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे या वर्षीची राजकीय गुरू पौर्णिमा राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरला.
आता आगामी निवडणूकीसाठी तिकिटासाठी केलेली राजकीय गुरू पौर्णिमा कुणाच्या पथ्यावर पडणार हेही पहावे लागणार आहे. तर गुरू पौर्णिमेनिमित्त राजकीय गुरू कोणकोणच्या डोक्यावर हात ठेवणार हे निवडणुकीच्या आखाड्यात समजणार आहे. मात्र राज्यातील सत्ता बदलानंतर राजकारणातील सद्याची परिस्थिती पहाता या वर्षीचे गुरू पुढच्या गुरू पौर्णिमेपर्यंत टिकतील का? की स्वार्थासाठी गुरू देखील बदलले जातील हे पाहणे मोठ्या औत्सुक्याचे राहणार आहे




