पिंपरी : प्रेयसीला जॉयराईडला घेऊन जाण्यासाठी कार आणि मोटारसायकल चोरल्याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान त्याने आतापर्यंत १३ दुचाकी आणि दोन कार चोरल्याचे पोलिसांना सांगितले.
पिंपरी चिंचवडमधील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात पोलिसांनी त्याला चोरीच्या कारसह पकडले. यश किरण सोळसे (२०, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची वाहने पोलिसांकडे आहेत.




