कार्ला- आठवड्यातील सुट्टीचे शनिवारी व रविवारी मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर बंदी होती. पण या आठवड्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर शनिवारी आणि रविवारी तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर खुप गर्दी झाली होती. यात कार्ला येथील आई एकविरादेवी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
आई एकविरादेवी भाविकांची व लोहगड विसापूर किल्ले, भाजे, कार्ला लेणी, भाजे धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुक कोंडी होत होती. वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी लोणावळा ग्रामीण सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश माने यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकाॕन्सटेबल दुर्गा जाधव व लोणावळा ग्रामीण पोलिस प्रयत्न करताना दिसत होते.




