मुंबई : ज्यांना शेंदूर लावला, ते शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवाचं आहे. याआधी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आता शिवसेना संपवण्याचा डाव आखलाय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे. किती वादळ आली तरी शिवसेनेची पाळं मुळं घट्ट आहे आहेत. जे गेले त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं. अन् काल त्यांनी आम्हाला गद्दार बोलू नका अशी विनंती केली. हे आम्ही नाही, त्यांनी त्यांच्या कपाळावर टिक्का लावून घेतलया. जे गेले आहेत, त्यांच्या बरोबर एकही शिवसैनिक गेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
2019 मध्ये सत्ता वाटप सर्व समसमान ठरले होते. पण त्यानंतर जागा तर कमी दिल्याच. पण जे ठरले होते, त्याबाबात नाही म्हणाले. त्यावेळी त्यांनी अपक्ष आमदारांना साथ देत शिवसेनेच्या जागा पाडल्या. अडीच अडीच वर्ष सत्ता द्या म्हटले होते. तेव्हा नाही म्हणाले मग आता कसं जमलं. हे आधीच झालं असते, तर सन्मानं झाले असते. मनावर दगड ठेवून करायची गरज नव्हती, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी लगावला.



