राज्यात सध्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान सरकारकडे बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? असा सवाल करत दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्याशिवाय राज्यात कोणताच निर्णय होत नाही असा टोला पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
हवामान खात्यातर्फे काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक ठिकाणच्या शाळांना त्या त्या भागातील जिल्हाधीकाऱ्यांना सुरक्षेच्यादृष्टीने शाळांना सुटी जाहीर केली होती. मात्र, काही भागात तुरळक पाऊस सोडला तर हवामान खात्याचा हा अंदाज सपशेल चुकल्याचे समोर आले. हवामान खात्याच्या या अंदाजवार राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.



