
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडलं आहे, यानंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या दरम्यान कोरेगाव भीमा प्रकरणातील तक्रारदार सुषमा अंधारे या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सुषमा अंधारे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, यापुर्वी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. काही दिवसापूर्वी अंधारे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यान अंधारे यांच्या प्रवेशामुळे पुण्यात शिवसेनेला आक्रमक चेहरा मिळणार आहे. सध्या शिवसेना कोणाची यावरून पेच निर्माण झालेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. मात्र अशा स्थितीत देखील अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेणे धाडसाचं मानल जात आहे.
