पिंपरी : चिंचवडगाव ते वारजे माळवाडी बस काळेवाडी येथून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. यात फिर्यादी हे सीएनजी बस चिंचवडगाव स्थानकाहून प्रवाशांना घेऊन २६ जुलैला संध्याकाळी रवाना झाले होते. संध्याकाळी ७.५० च्या दरम्यान १६ नंबर बस स्टॉप ते काळेवाडी फाटा बस स्टॉप दरम्यान आरोपीने जोरजोरात बेल वाजविली.
आरडा ओरड करीत “तुम्हाला बस थांबवता येत नाही का” असे म्हणून फिर्यादी यांना धक्काबुक्की केली व हाताने मारहाण केली. तसेच दैनंदिन शासकीय कामकाज करीत असताना शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.
मनोज इंगावले, (वय ४२ पीएमपीएल कंडक्टर, रा. चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. स्वप्निल चिमीगावे (वय २८ रा. काळेवाडी फाटा) या आरोपी विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




