खडसेंची पत्नी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दूध सहकारी कारभारातील अनियमिता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शासनातर्फे समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करत शिंदे फडणवीस सरकारने एकनाथ खडसे यांना धक्का दिला आहे.
नगराज पाटील यांनी केली होती तक्रार जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील मोठ्या गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. मात्र, गेल्या मविआ सरकारकडून याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने खडसेंना दुहेरी धक्का देत याच्या चौकशीसाठी समितीची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे.



