निगडी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कडून अनेक अतिक्रमण कारवाई केली जात आहे. तरीही फुटपाथ वरती अनेक ठिकाणी अतिक्रमणे केलेली दिसून येत आहेत. निगडी पुलाखाली प्राधिकरणकडे रोडवर आणि पिंपरी कडून येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर फुटपाथवर मोठ्या संख्येने अतिक्रमण दिसून येत आहे. हा संपूर्ण बंद करून वायरिंग काम सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ आणि फ प्रभाग दोन मिनिटाच्या अंतरावर आहे. या चौकातून महापालिकेचे शेकडो अधिकारी येजा करतात. मात्र त्यांना संपूर्ण फुटपाथ लहान मोठे व्यवसायिक यांनी व्यापून टाकलेला उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाही. की आर्थिक हितसंबंध व्यवस्थित जपत असल्यामुळे या ठिकाणी टपरीधारकांवर कोणतीही कारवाई होत नाही असा संवाद येथील नागरिक करताना दिसत आहेत.

महाराणा प्रताप पुतळा समोर हातगाडी धारक ह्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून खुलेआम व्यवसाय करत आहे. फुटपाथ संपूर्ण बंद करण्यात आला आहे. फ क्षेत्रिय अधिकारी श्री. भवरे मासिक हप्ता घेतात. हातगाडी धारक यांच्याकडून अनेक वेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त ह्यांना अतिक्रमण संदभात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र रस्त्यावर अतिक्रमण करून खुलेआम व्यवसाय सुरूच आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली जात आहे. रस्त्यावर नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रिक्षा चालक व हातगाडी धारक ह्यांनी रस्त्यावर अतिक्रमण खुप मोठ्या प्रमाणात केले असे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महाराष्ट्र माझा यांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.




