लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. समर्पित आयोगाच्या शिफारशी नुसार लोणावळा नगरपरिषदेसाठी ओबीसींसाठी 10.2 टक्के इतके आरक्षण निश्चित करण्यात आले होते.
त्यानुसार लोणावळा नगरपरिषदेचा
प्रभाग क्र. 1 (न्यू तुंगार्ली, इंदिरानगर),
प्रभाग क्र. 2 (तुंगार्ली) व
प्रभाग क्र. 3 (भुशी, रामनगर) हे तीन प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत.
यापैकी प्रभाग क्र. 1 व प्रभाग क्र. 2 मधील जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव झाल्या आहेत. तर प्रभाग क्र. 13 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी थेट राखीव झाली आहे.
ओबीसी आरक्षणा नंतर लोणावळा नगरपरिषदेच्या 13 प्रभागातील एकूण 27 जागांपैकी 4 जागा अनुसूचित जातीसाठी (2 महिला, 2 पुरुष) व 1 जागा अनुसूचित जमातीसाठी (महिला), 3 जागा ओबीसी साठी (2 महिला, 1 पुरुष), 9 जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी व 10 जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. निवडणूक नियंत्रक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहिर केली.




