पुणे : कोरोनाने अहंकारी बनवलेल्या माणसाला बरेच काही शिकवण दिली आहे. कोविड १९ च्या काळात शेजारी शेजारी राहणारी माणसे एकमेकांच्या घरात जात नव्हती. एकमेकापासून दूर दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. पुणे, पिंपरी चिंचवड या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीचे पॅटर्न आता बदलले आहे. आता लोक गर्दीच्या ठिकाणी घरे घेण्यास नकार देत आहेत.
त्यामुळे डेव्हलपर्सनी देखील शहराबाहेर घरे बनविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता अनेकजण शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात बाहेर सुरक्षिततेसाठी घरे घेण्याचा विचार करत आहेत. कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात घरे खरेदीची पद्धत बदलत आहे. कारण सध्या लोक प्रथम आरोग्य सुरक्षेला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षात जास्तीत जास्त घरांची खरेदी शहरापेक्षा ग्रामीण व उपनगरात भागात केली जात आहे.
तसेच आता ग्राहक ई-स्कूल, घरातून काम आणि सुरक्षेच्या दृष्टीने घर विकत घेत आहेत. अशा परिस्थितीत विकासक घर खरेदीदारांची मागणी लक्षात घेऊन ग्रामीण पीएमआरडी कार्यक्षेत्रात निसर्गाच्या सान्निध्यात सर्व सोयीने सज्ज घरांची उभारणी करत आहेत. बांधकाम क्षेत्राला सध्या बरे दिवस आलेले आहे. मात्र, वाढलेल्या दरवाढीचा फटका बसू लागला आहे.




