राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाला कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे.
ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते. त्या राज्यात सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जाती-पाती, धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्यात आग लावण्याचं काम जर कोश्यारी यांनी केलं असेल, तर त्यांना नुसतं घरी पाठायचं की तुरुंगात पाठवायचं हा विचार करण्याची आणि कोल्हापुरी जोडे दाखविण्याची देखील वेळ आलेली आहे. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे.


