मुंबई : भाजप दिलेला शब्द पाळतो, नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला, आता सांगा कोण खोटं कोण बोलतेय? असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ते औरंगाबाद येथे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेऊन आलेल्यामधील एकजणही म्हणाला नाही की, मी ईडीच्या धाकामुळे आलोय. आमच्या मर्जीने आलोय. आम्ही अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलोय. शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय. ईडीच्या धाकाने, कोणत्याही तपास यंत्रणाच्या धाकानं कुणी येत असेल तर मला नकोय. असेही शिंदे यांनी म्हटले आहे.



