मुंबई – शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांची बाजू घेत भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या का? अशी चर्चा होती. त्यातच आज शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसाठी अजुनही दारं खुले असल्याचं म्हटलं. त्यामुळे आमदार परतणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले की, युतीमध्ये काय चाललं हे लवकरच कळेल. एकत्र येण्याची भूमिका घेणं आधीच कळल असत तर बर झालं असता. आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वा मान्य असेल तर त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे अजुनही खुले आहेत. याआधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट केलं असल्याचही अहिर यांनी म्हटलं.



