चांदखेड : भारताच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चळवळी झाल्या. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपले शेवटचे स्वातंत्र्य युद्ध भारत छोडो.. चले जावं आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती. जी ९ ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते. याच दिनाचे औचित्य साधून चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता ५ वी मधील विद्यार्थ्यांनी क्रांती दिन विविध उपक्रमांनी साजरा केला.
उपक्रमांची सुरुवात सरस्वती पूजन करून झाली. त्यानंतर स्वातंत्र्यासाठी क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या सर्व सेनानी वीरांना क्रांती दिनानिमित्त नमन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षक पवार सर यांनी क्रांती दिना विषयी मुलांना माहिती सांगितली. यावेळी सौ. पवार मॅडम, सौ. लोंढे मॅडम, सौ. भोये मॅडम, सौ. सुपे मॅडम, सौ. फापाळे मॅडम, पवार व्ही. बी. मॅडम, खांडवी सर, जाधव सर, झांजरे सर, शेलार सर, मधवे सर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे महत्त्व सांगितले.
क्रांती दिनानिमित्त मुला-मुलींनी विविध वेशभूषा केल्या होत्या. काही मुली झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, राणी ताराबाई तर मुलांनी भगतसिंग, पंडित नेहरू आदी क्रांतिवीरांच्या वेशभूषा केल्या होत्या. यामध्ये माहिका गायकवाड, केतकी गायकवाड, प्रांजल साळुंखे, तनया कोंडभर, श्रद्धा कोंडे, कौस्तुभ शिंदे, समर्थ गायकवाड, ज्ञानेश्वर चौगुले यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.




