तळेगांव स्टेशन (प्रतिनिधी- संदीप गाडेकर) दि. 8 दरवर्षी प्रमाणे मैत्री दिनाचे औचित्य साधून ट्रेकिंग पलटन पुणे ग्रूप च्या ट्रेकर्स नी रविवार दि 7 ऑगस्ट 2022 रोजी एका दिवसात सातारा जिल्हातील संतोषगड, वारूगड, महिमान गड आणि वर्धनगड असे चार गड सर केले.
यातील वारू गडावर पर्यावरणास घातक कचरा गोळा करून स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत ट्रेकिंग पलटन चे नितीन कुलकर्णी, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर आरर्णे, अमोल गोरे, अजय खडके आणि डॉ सुरेश इसावे यांनी सहभाग घेतला. ट्रेकिंग पलटन ग्रूप ची ही ९१ वी मोहीम होती. यापूर्वी २०२१ मल्हार गड, २०२० लॉक डाऊन २०१९ – चंदन वंदन २०१८ – कोथळी गड अशा स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या होत्या.




