पवनानगर (वार्ताहर) : मावळ गोळीबारात शहिद झालेल्या शेतकर्याना श्रद्धांजली वाहण्यासाठी येळसे येथील श्रदांजली सभेत बोलताना, युती शासनाच्या काळात शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले आहे. स्मारक उभारण्यात आले आहे. गोळीबारात शहीद झालेल्या तीन शेतकऱ्याच्या वारसांना नोकऱ्या देण्यात आल्या आहे. फक्त आमची महत्वाची मागणी की हा प्रकल्प कायम स्वरुपी रद्द करावा व प्रकल्प कायम स्वरुपी रद्द हईपर्यंत आमचा लढा सुरूच ठेवणार आहे. असे मत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले आहे.
९ ऑगस्ट २०११ रोजी पवना बंदिस्त जलवाहिन्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनात झालेल्या गोळीबारात तीन शेतकरी मृतुमुखी पडले होते या घटनेला ११ वर्षे पूर्ण होत.यावेळी येळसे येथील स्मारकावर श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे बोलताना भेगडे म्हणले कि, बंद जलवाहिनी आंदोलनाचे आपण साक्षीदार आहोत. २००८ पासून बंद जलवाहिनीचा लढा आपण सुरू केला होता तो आज पर्यंत लढा लढत आहोत. आंदोलन करताना आंदोलक शेतकऱ्यांनी सार्वजनिक मालमतेचे नुकसान केले म्हणून ७० लाख रुपये शेतकऱ्यांनी भरावे लागणार होते ते मुनगंटीवार यांनी माफ करून दिले आहे. तसेच कोथूर्णे येथील सात वर्षाच्या चिमुरडीवर जो अत्याचार झाला आहे. त्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून त्या बाबत मावळच्या जनतेच्या मनातील मागणी नुसार त्याला फाशीची शिक्षा होईलच.
शिसेनेच्या वतीने घटनास्थळी जाऊन शहिदांना श्रद्धांजली...
गोळीबारीत शहिद झालेल्या तीन शहिद शेतकऱ्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ज्याठिकाणी या शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या , त्याच ठिकाणी शिवसैनिकांनी जाऊन दरवर्षी प्रमाणे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी सरपंच बबन खरात, माजी उपतालुका प्रमुख मारुती खोले, माजी उपसरपंच अनिल भालेराव, पवना नगर शिवसेना शहरप्रमुख सुरेश गुप्ता, सुनील इंगुळकर, माजी उपसपंच श्यामबाबू वाल्मिकी, सनी मोहिते, कार्यालय प्रमुख तुषार घाग, उमेश ठाकर शाखाप्रमुख रामभाऊ डोंगरे, पप्पू खरात आदी पदधिकारी उपस्थित होते .
ज्ञानेश्वर दळवी (समिती अध्यक्ष ) वारसांना नोकरी दिली गेली आहे. व खटले मागे घेण्यात आले आहे. अंतिम विजय हा सत्याचाच असतो. ज्या शेतकऱ्यांना गोळ्या लागल्या त्यांना नोकरीत घेण्यात यावे. व प्रकल्प कायमचा रद्द करा. तत्काळ काही धोरण करून हा कायम रद्द केला पाहिजे. पाणी आडले म्हणून आज हे वैभव आहे. ज्या शेतकऱ्याच्या जमिनी पाण्यात गेल्या आहे त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप लवकरात लवकर करावे.
लक्ष्मण भालेराव (आर पी आय तालुकाध्यक्ष )
पवना बदिस्त जलवाहिनीला विरोध कायम राहील. सरकारकडे ही जलवाहिनी कायमची रद्द व्हावी म्हणून निवेदन देणार आहे. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, गुलाबराव म्हाळस्कर, माजी सभापती निकिता घोटकुले, किसन खैरे, संदिप काकडे, बाळा घोटकुले, शांताराम कदम, भास्करराव म्हाळस्कर, प्रशांत ढोरे, शंकरराव शेलार, लक्ष्मण भालेराव, किरण राक्षे, शिवाजी पवार कुंभार, विश्वनाथ जाधव, संदिप भुतडा, गणेश ठाकर, कल्याणी ठाकर, सुमित्रा जाधव, ज्ञानेश्वर आडकर, एकनाथ पोटफोडे, सुरेखा जाधव, बाळासाहेब ठुले, अरूण भेगडे, भरत घारे, सरपंच जयवंत घारे आदी उपस्थित होते.




