पवनानगर वार्ताहर : पवना बंद जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी बौर येथे झालेल्या आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला सोमवारी (ता. ९) ११ वर्षे पूर्ण झाले असून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या वतीने सकाळी ९ वाजता येळसे येथील शहीद स्मारकाजवळ श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी गणेश खांडगे, किशोर भेगडे,संदिप आंद्रे, सुधाकर शेळके,किशोर सातकर, महादेव कालेकर, नामदेव ठुले, चंद्रकांत दहिभाते, संजय मोहोळ, माऊली आढाव,सुवर्णा राऊत, अजित चौधरी, ज्ञानेश्वर निंबळे,लाला गोणते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना गणेश खांडगे म्हणाले की,
मावळ गोळीबाराला आज ११ वर्षे पूर्ण होत असुन आमच्या मावळ तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झाला. त्यामधील मृतांच्या वारसांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजितदादा पवार यांच्या माध्यमातुन नोकरी दिली. बंद जलवाहिनी योजनेला आम्ही मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाजुने आहोत. मावळ तालुक्यातील शेतकरी जे निर्णय घेतील ते आम्हा मान्य राहिल.




