वडगाव मावळ :- मागील अनेक वर्षांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या कुरवंडे येथील धनगर वस्तीवर देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांमुळे वीज पोहचली आहे.
मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील धनगर वस्तीवर अद्याप पर्यंत वीज पोहचली नसल्याने आताच्या आधुनिक काळात देखील येथील नागरिक अंधारातच राहत होते. विद्युत पुरवठया अभावी तंत्रज्ञानाच्या युगात देखील या वस्तीवर वास्तव्यास असणारे नागरिक टेलिव्हिजन व इतर तांत्रिक साधनापसून वंचित होते. येथील लोकवस्तीवरील वीज पोहचविण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता.
या निधीतून धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा करण्यासाठी २८ विजेचे खांब, विद्युत वाहक तारा व ६३ केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा निमित्त आज आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करून येथील धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षे येथील नागरिक विजेची मागणी करून देखील त्यांची कोणी दखल घेत नव्हते.मात्र आमदार सुनिल शेळके यांनी त्यांची समस्या सोडविल्याने येथील नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, दिपक हुलावळे, महावितरणचे अभियंता विष्णु पवार, , सरपंच अनिता कडू, उपसरपंच सुप्रिया पडवळ, जयश्री कडू, सखाराम कडू,विशाल कडू, नारायण कडू, सुनिल ढोरे, बाळासाहेब भानुसघरे, संतोष राऊत, अमोल केदारी, बाबा मुलाणी, सुरेश कडू, संदीप आंद्रे गणेश थिटे, संजय बाविस्कर, अनिल मालपोटे, सागर बोडके, अजिंक्य टिळे, गोरख हिंगे, दिनेश गायकवाड, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.




