मुंबई : राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेली आहे. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत.
विरोधामधील महाविकास आघाडीचे नेते अधिवेशनात आक्रमक पवित्र घेत असल्याने व नव्यानेच प्रथम मुख्यमंत्रीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी विधान परिषद सभागृह नेता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


