निगडी – देशभरात भारताच्या ७५ व्या स्वतंत्र दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर लढा यूथ मूव्हमेंट च्या माध्यामातून निगडी मध्ये “हर घर तिरंगा, हर घर संविधान” अभियान राबविण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सप्ताह साजरा करत असताना निगडी परिसरामधे ७५०० संविधान उद्देशिकेच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. ध्वजारोहण, सलामी, राष्ट्रगीतासह भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
सदर प्रसंगी वंचित नेते रजनीकांत क्षिरसागर, भागातील नगरसेवक सचिन चिखले, सुमनताई पवळे, उत्तम केंदळे, बापू घोलप, माजी नगरसेवक तानाजी खाडे, रशीद आत्तार, रमेश शिरसाठ अनिल गोरे, तसेच लढा यूथ मूव्हमेंट चे संस्थापक प्रमोद क्षिरसागर, अध्यक्ष बुद्धभूषण अहिरे, भैय्यासाहेब ठोकळ, अमित गोरे, समाधान कांबळे, सिद्धार्थ मोरे, गणेश गाजरे ज्ञानेश्वर काळे, संदीप माने अतिश नागटिळक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




