मुंबई: ‘आले रे आले गद्दार आले… ५० खोके.. एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. त्यावर अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांनीही ‘तुम्हाला हवेत का खोके’ असे विरोधकांना प्रत्यमुत्तर दिल्याने विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर काहीकाळ वातावरण तापले होते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0uaFkXrC3J9RUjzngSNFpCibLzMAHFifH5qK2cmLA3TGmdVEnTDj5hXNEwjW5cU7Jl&id=100043049660205
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात फलक फ़डकवीत घोषणाबाजी केली.



