मोशी : रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणात गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलांनी दहीहंडीचा आनंद लुटला. गोविंदा आला रे… आला… यासारख्या गाण्यावर नृत्य करत ते दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. या कार्यक्रमात चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्याना आपल्या सण उत्सवांची माहिती व्हावी, तसेच सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता दहीहंडी उत्सव आयोजित केला होता असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. भारताच्या अमृतमहाेत्सवनिमीत्त केलेले सुशाेभीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला यांचे महत्व सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विनायक भोंगाळे, सचिव संजय भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालक सौ. कविता भोंगाळे कडू पाटील, विश्वस्त सौ. सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, कार्यकारी संचालक सौ.काजल छतिजा तसेच दोन्ही विभागाचे मुख्यध्यापक शशिकांत जोडवे, आर. गोविंद व सर्व शिक्षक उपस्थित हाेते.



