रावेत : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), रावेत येथे दि. १८ व १९ रोजी श्रीकृष्णजन्माष्टमीचा सोहळ्या मोठ्या दिमाखात पार पडला. मंदिराचे प्रवेशद्वार ते सभागृह फक्त हरिनामाचा जयघोष कानी येत होता. अभिषेक, श्लोक पठण नृत्यनाटिका नाटक अशा विविध कार्यक्रमांनी महोत्सवाची शोभा वाढली.

रात्री १२ नंतर सुद्धा ओसंडून वाहणारी गर्दी प्रत्येकाच्या मुखी ” हरे कृष्ण चा जयघोष तरुणांची लक्षणीय संख्या हरिनामात तल्लीन + पणे नृत्य करायला लावणारा वाद्यवृंद व भक्तांच्या उत्साहामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. चाळीस हजार भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी या महामहोत्सवाला उपस्थित भक्तांचे मंदिराचे अध्यक्ष श्रीमान जगदीश गौरांग दास यांनी आभार मानले.




